सदाफुली
तुला फुले चार आली आणि मन सुखावले
तुझी हिरवळ पाहून मन नादात राहिले
जेव्हा येती ढग काळे होतो आनंदी मी फार
लाट सुखाचीच एक करी पायाला ही गार
कधी पाऊस उन्मत वाटे उरी खोल भीती
झडू लागतात पाने यत्न फितेही पडती
माया हीच विठ्ठलाची दुःखी करे कधी फार
मग तुझ्याही पायाशी येती अंकुरही चार