महापुरुषांचा पराभव
महापुरुषांचा पराभव हा त्यांच्या विरोधकांनी नसतो केलेला. त्यांचे अनुयायी हेच त्यांच्या पराभवाला कारणीभूत असतात
पुढच्या पिढीने मोदी-शाह, किव्वा राज ठाकरे ह्याची मंदिरे उभारली तर काही नवल नाही. परवा बातम्यांमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले “अहो अटल सेतू उदघाटनाला अटलजींच्या फोटोच नव्हता “ मी म्हणतो हवाच कशाला. किव्वा त्या पुलाला अटलजींचे नाव तरी का द्यावं? रामाने सेतू बांधला तेव्हा तो म्हणाला असेल का कि “वानरांनो ह्या सेतूला माझ्या आजोबांचं नाव द्या”. कोणाला त्या महापुरुषाचं नाव माहित तरी आहे का ? आणि माहीत नाही म्हणून तो काही कमी महत्त्वाचा असेल असं तुम्हाला वाटतं का?
कुठल्याही पुढाऱ्याला लगेच देव करून त्यामागे एका विशिष्ट समाजाची फळी उभी करून उदो उदो करायचा सपाटा लागला आहे. आपल्याला स्वतःला विचार करायला उसंत नाही आणि केलात तर त्याला काही महत्त्व नाही म्हणून आपल्याला कमीपणा वाटतो.
गांधी विरुद्ध सावरकर असा वाद हवाच का ? जर आज समजा दोघेही जिवंत असते आणि तुम्हाला त्यांना भेटता आले असते. तर गांधींना विचारल्यावर, “अहो तुम्हाला सावरकरांचे विचार पटत नाहीत, पण तुम्हाला त्यांचा तिरस्कार आहे का हो ?” किंवा सावरकरांना विचारलं असत कि “गांधीजींचे संपूर्ण अहिंसेचे तत्त्वज्ञान तुम्हाला पटत नाही, पण त्यामुळे तुम्ही गांधी ह्या व्यक्तीचा तिरस्कार करता का ?” ह्या प्रश्नांची उत्तरे कंदाचित तुमहाला “नाही “ अशीच मिळाली असती. कारण व्यक्तीच्या विचारांपेक्षा आणि कृती पेक्षा त्यामागची निष्ठा आणि हेतू जास्त महत्त्वाचा.
महापुरुषांचा पराभव हा त्यांच्या विरोधकांनी नसतो केलेला. त्यांचे अनुयायी हेच त्यांच्या पराभवाला कारणीभूत असतात. आज आंबेडकर, फुले, सरदार पटेल ह्यांचे मोठमोठे पुतळे उभारून देवळे बनवून लोक का जमवली जातात. हे असे करून त्यांचा अनुयायी त्यांच्या पराभवाच्या पायघड्या अंथरत असतो.
हिंदू समाजात व्यक्तीपेक्षा त्याच्या विचारांना आणि त्यामागच्या हेतूला जास्त महत्त्व आहे, असायला हवं. हे आपण विसरत चाललो आहोत, किंबहुना विसरलोच आहोत.
राम वनवासात शाकाहारी होता कि मांसाहारी ह्यावर आपण रामायणातलली मूल्ये मापणार आहोत का ?