← सर्व लेख
मनातल्या गोष्टी · २७ जून २०२३ · १ मिनिट वाचन

दान कोणाला?

दान कोणाला

माझं एक काम होतं माटुंगा स्टेशन जवळ. आजकाल सुट्टे पैसे , किंबहुना पैसे असे लागतच नाहीत पण निवे कडून मागुन घेतले ५०-१०० रुपये, तिच्याकडे नेहेमी असतात देवास ठाऊक कसे. पण तिने लगेच दिले. स्टेशन च्या थोडी लांब गाडी पार्क केली.
जवळ एक म्हातारी बसलेली दिसली. मला उगाच काय वाटलं कोण जाणे समोरच एक छोटं दुकान वजा पानवाला होता. त्याच्याकडून पार्ले G चा एक पुडा नी पाण्याची बाटली घेतली. म्हातारी जवळ गेलो आणि तिला दिली. तिने पण काही न बोलता हात वर करून आशीर्वाद दिल्यासारखं केलं.
मी पुढे चालू पडलो तेवढ्यात एक कुत्रा कुठूनसा तिच्याकडे धावत आला आणि समोर उभा राहिला. तिने बिस्किटाचा पुडा उघडला आणि एक बिस्कीट त्याला दिला आणि एक स्वतः खाऊ लागली.