← सर्व लेख
मनातल्या गोष्टी · २८ एप्रिल २०२६ · २ मिनिटे वाचन

Capitalism

मी सध्या रोज सकाळी चालायला जायचा प्रयत्न करतो. ह्याने दोन गोष्टी घडतात माझं चलन वलन होत. माणसे दिसतात. आणि “व्यायाम” जमेल तेवढा. असो. पावणे सातला मी निघालेलो वाटंत, आता साडेसात झालेले. मी फोन काढून पाहिलं, डोक्यात बल्ब लागला, ब्रेकफास्ट ! माझ्या डोळ्यासमोर दोन तीन ब्राउनी दिसायला लागलेले. कारण बायको ऑफिसच्या ‘तयारीला लागलेली असणार. आता हे समवयीन,लग्न झालेल्या, घरून काम करणाऱ्या, पुरुषांनाच कळेल. लागतात ना हो आपल्याला ब्राउनी ?

आम्ही बरेच वेळा अमेयचे पोहे घेतो. आवडतात आम्हाला जिप्सीचे, पण जिप्सीचे मालक आळशी आहेत सकाळी लवकर उठत नाहीत. पोहे घ्यायच्या आधीच मी फोने केलेला न विसरता “काय आणायचं आहे ?“ मग बायकोने “मलापण पोहे आण, पण “जमलं” 😉 तर खमणीवाल्याकडून सामोसा आण आणि भाजी आण. आजच्या डब्याला भाजी नाहीये” असं बजावलेलं.

मी आता अमेय कडे पोह्याची ऑर्डर देऊन भाजी मार्केट कडे उजवीकडे वळलो. एक म्हातारी रोजची भाजीवाली दिसली, मी पैसे देताना smile दिला, तर ती मला काहीतरी सांगायला लागली ततेवढ्यात मागे कचऱ्याची गाडी घरघर करत आली. मला भाजीवालीचं काहीही ऐकू आलं नाही. एकही शब्द नाही. मी हात मिळवून निघालो.मागे बघून परत हसलो. माफीच्या भावनेने मला ऐकायचं होत पण मी घाईत पण होतो ब्रेकफास्ट आणि बायकोचं ऑफिस माझ्या डोक्यात होत. ह्यालाच capitalism म्हणतात का?

आपल्या सुखसुविधांसाठी आपण सामान्य माणसाचं भाष्य नगण्य समजतो. इथे नीट समजून घ्या, मला भाजीवालीशी व्यवहार तिच्या फायद्याचा करायला हरकतनाही, आणि तिच्या बोलण्याचा माझ्या जीवनाशी काही संबंध पण नसणार आहे, मला ऐकायचंही आहे पण त्याला वेळ देणं आपल्याला महाग वाटतं. आता त्या आईची न्यूज चालू आहे कारण ति एका प्रतिष्ठित नेत्यावर ओरडली आणि धडा शिकवला. पण आपण रोज असेच वागतो. आता तो नेता त्याचं त्याचं काम करतोय आणि त्याला ना त्या आईला एकमेकांशी काही घेणं देणं, (उपहास). आणि त्या आईच्या बोंबलण्यानी त्याला काहीही फरक पडणार नाही.(परत उपहास) पण आपणही हेच करतो, किव्वा शिकलोय, पश्चिमेकडच्या संस्कृती कडून. चूक की बरोबर मला नाही माहित.

पण हे होत राहणार

लेखकाला पत्र लिहा

हा लेख वाचून काय वाटलं? तुमचं पत्र फक्त मला दिसेल, इथे प्रसिद्ध होणार नाही.

०
लेख कसा वाटला? (ऐच्छिक)

नाव आणि ईमेल फक्त पत्र वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जातात. ते कुठेही दाखवले जात नाहीत.