← सर्व लेख
कविता · १३ नोव्हेंबर २०२६ · १ मिनिट वाचन

अपुरा

शिकविले शब्द नी दिली लेखणी
परी उण्या वाक्यांस अर्थ उमगेना

दिली पहार नी दिले पाणि
हुरहूर की जीवन कधी लागे

दिले बीज नी पायी धरित्री
तरी अंकुरे वाट पहावेना

जाऊ कुठे नी शोधू काय
सज्जना तो स्वच्छ सदरा सापडेना

मिळो काय नी दिले काय
शांति उरी तरी काकस्पर्षाने अपुरा

लेखकाला पत्र लिहा

हा लेख वाचून काय वाटलं? तुमचं पत्र फक्त मला दिसेल, इथे प्रसिद्ध होणार नाही.

०
लेख कसा वाटला? (ऐच्छिक)

नाव आणि ईमेल फक्त पत्र वाचण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वापरले जातात. ते कुठेही दाखवले जात नाहीत.